मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रेलरचा ब्रेक फेल; १५ ते १६ वाहनांना धडक

शनिवारी, २६ जुलै रोजी दुपारी खोपोलीजवळ मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात घडला, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. खंडाळा घाटात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे ट्रेलरचा वेग वाढला
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रेलरचा ब्रेक फेल; १५ ते १६ वाहनांना धडक
Published on

खोपोलीजवळ मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी (२६ जुलै) दुपारी भीषण अपघात घडला. ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. खंडाळा घाटात पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे ट्रेलरचा वेग वाढला आणि समोर असलेल्या अनेक वाहनांना या ट्रेलरने एकामागून एक धडक दिली. या अपघातात अंदाजे १५ ते १६ वाहने अपघातग्रस्त झाली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरचे खंडाळा घाटात तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या ट्रेलरने सुमारे दीड ते दोन किमीपर्यंत १५ ते १६ वाहनांना जबर धडक दिली.

वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान -

या अपघातात २५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका पथके घटनास्थळी तात्काळ दाखल झाली असून बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले.

मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी -

अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे. प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत. प्रवाशांना वाहतूक पूर्ववत होईपर्यंत शक्यतो प्रवास टाळण्याचा किंवा इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या घटकांची चौकशी सुरू केली आहे. ब्रेक फेल होणे हे प्राथमिक कारण मानले जात असले तरी, वाहनाची देखभाल, ओव्हरलोडिंग, चालकाची प्रतिक्रिया आणि रस्त्याची स्थिती याबाबतही तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in