इगतपुरी : रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर CBI चा छापा; सायबर फसवणुकीतून कोट्यवधींचा घोटाळा उघड, मुंबईतील ५ जण अटकेत

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमधून सुरू असलेल्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर CBI ने छापा टाकून मोठी कारवाई केली.
इगतपुरी : रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर CBI चा छापा; सायबर फसवणुकीतून कोट्यवधींचा घोटाळा उघड, मुंबईतील ५ जण अटकेत
प्रातिनिधिक फोटो
Published on

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टमधून सुरू असलेल्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर CBI ने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सायबर फसवणूक करणाऱ्या मुंबईतील ५ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये तब्बल एक कोटी रुपयांच्या ७ लक्झरी कार, ४४ लॅपटॉप, ७१ मोबाईल फोन, १.२० कोटी रुपयांची रोकड, ५०० ग्रॅम सोने, ५००० USDT क्रिप्टोकरन्सी (सुमारे ५ लाख रुपये) आणि २००० कॅनेडियन डॉलर किमतीची गिफ्ट व्हाउचर्स (१.२६ लाख रुपये) जप्त करण्यात आले आहेत.

अमेरिका आणि कॅनडामध्ये पीडितांना फसवल्याबद्दल CBI ने ८ ऑगस्ट रोजी सहा आरोपींविरुद्ध सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर इगतपुरी येथील रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. तसेच, अज्ञात व्यक्ती आणि बँक अधिकाऱ्यांविरुद्धही सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

CBI ने दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे विशाल यादव, शेहबाज, दुर्गेश, अभय राज आणि समीर उर्फ कालिया उर्फ सोहेल अशी आहेत. हे सर्व आरोपी मुंबईतील रहिवासी आहेत.

परदेशी नागरिकांची फसवणूक

आरोपी स्वतःला 'अ‍ॅमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस' म्हणून ओळख देत अमेरिकन, कॅनेडियन आणि इतर देशांतील नागरिकांना कॉल करून फसवत होते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम गिफ्ट कार्ड किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे हस्तगत केली जात होती.

कॉल सेंटरमध्ये डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा ६० ऑपरेटरच्या मदतीने काम चालत होते. छाप्यावेळी ६२ कर्मचारी प्रत्यक्षात फसवणूक कॉल करताना रंगेहात सापडले. CBI सध्या जप्त लॅपटॉप व मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करत आहे. ही कारवाई सायबर गुन्ह्यांवर CBI ची आतापर्यंतची मोठी मोहीम मानली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in