नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

या खटल्याचा निकाल अवघ्या ५५ दिवसांत लागला असून, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायालयाने सोमवारी (दि. २९) फाशीची शिक्षा सुनावली. पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत चाललेल्या या खटल्याचा निकाल अवघ्या ५५ दिवसांत लागला असून, अत्याचार आणि हत्या प्रकरणातील राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.

२५ जूनला दोषी, आज शिक्षेची घोषणा

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी यापूर्वी २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते. त्यामुळे आरोपीला जन्मठेप की फाशी, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावत खटल्यावर शिक्कामोर्तब केला.

वेगवान तपासामुळे विक्रमी निकाल

माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी जलद तपास करत न्यायवैद्यकीय आणि डीएनए पुराव्यांच्या आधारे अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर विशेष न्यायालयातील बंद दालनात (in-camera) सुनावणी झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या अलीकडील इतिहासातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
फाशी नको, त्याला ठेचून मारा, जिवंत जाळा; नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीचा संताप

सरकारी पक्षाने मागितली होती फाशी

'मिड डे' च्या वृत्तानुसार, विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी या गुन्ह्याचे क्रौर्य सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या 'अत्यंत दुर्मिळ प्रकरण' (Rarest of Rare) या निकषात बसत असल्याचा युक्तिवाद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने आरोपीचे वय आणि त्याने गुन्हा नाकारल्याचा मुद्दा मांडत सौम्य शिक्षेची मागणी केली होती.

पुराव्यांच्या आधारे ठरवले दोषी

२५ जून रोजी न्यायालयाने अनेक साक्षीदारांचे जबाब, न्यायवैद्यकीय अहवाल आणि पुराव्यांची तपासणी केल्यानंतर भीमराव कांबळे याला अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. तसेच, न्यायालयाने आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याचे नमूद केले होते.

नसरापूर प्रकरणाचा घटनाक्रम

१ मे २०२६ : नसरापूर गावात आजीच्या घराबाहेर खेळत असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला फूस लावून नेण्यात आले. गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गावकऱ्यांनी आरोपीची ओळख पटवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

२ ते ३ मे : घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. नवले पुलाजवळ महामार्ग रोखण्यात आला. पोलिस बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले.

४ ते १० मे : राजकीय नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर पीडितेच्या वडिलांनी न्याय मिळेपर्यंत गोपनीयता राखण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने जलद तपास आणि जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिले.

१६ मे : पोलिसांनी न्यायवैद्यकीय आणि डीएनए पुराव्यांच्या आधारे अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.

नसरापूर अत्याचार प्रकरण : आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
"त्याला ठेचून मारा अन् मला सांगूही नका"; नसरापूर प्रकरणानंतर आरोपीच्या पत्नी-मुलाची संतप्त प्रतिक्रिया

२८ मे : POCSO कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार न्यायालयाने आरोप निश्चित करत बंद दालनात सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

२१ जून : ५५ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद पूर्ण झाले. सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

२५ जून : विशेष न्यायालयाने पुरावे सिद्ध झाल्याचे नमूद करत भीमराव कांबळे याला अपहरण, बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले.

२९ जून : विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी सोमवारी आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली. POCSO अंतर्गत अवघ्या ५५ दिवसांत निकाल लागल्याने हा खटला राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक ठरला.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in