विधानसभेसाठी NCP अजित पवार गटाची पहिली यादी जारी, एका क्लिकवर बघा ३८ उमेदवारांची लिस्ट

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण ३८ उमेदवारांची यादी अजित पवार गटाकडून जारी करण्यात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण ३८ उमेदवारांची यादी अजित पवार गटाकडून जारी करण्यात आली आहे.

बघा ३८ उमेदवारांची यादी

भाजपने जागावाटपाआधीच ९९ जणांची यादी जाहीर केली असून महायुतीत भाजपच मोठा पक्ष ठरणार आहे. जागावाटपात भाजपला १५२ ते १५५, शिवसेना शिंदे गटाला ७८-८० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५२-५४ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपात महायुतीत अजित पवार गट सर्वात छोटा भाऊ ठरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून मंगळवारपासून निवडणुकीसाठी अर्ज भरण्ययास सुरूवात झाली असून २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. 

logo
marathi.freepressjournal.in