
पालघर जिल्ह्यातील वाघोबा खिंड जंगलात मंगळवारी (दि. ५) एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता आणि प्राथमिक अंदाजानुसार महिलेचा मृत्यू ४ ते ५ दिवसांपूर्वी झाला असावा. ही घटना पालघर-मनोर रोडलगतच्या जंगलात उघडकीस आली. PTI ने या घटनेचे वृत्त दिले आहे.
आधार कार्डवरून पटली महिलेची ओळख
घटनास्थळी पोलिसांनी तपास करताना एक आधार कार्ड मिळाले. त्याच्या आधारे महिलेची ओळख पटली असून ती मनोरमधील रायस्पाडा गावाची रहिवासी होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालघर पोलिसांनी सदर प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.