पनीर की ‘चीज ॲनालॉग’? मेनू कार्डवर स्पष्ट लिहिणे आता बंधनकारक

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’चा (वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनवलेले पनीरसदृश उत्पादन) वापर करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे.
पनीर की ‘चीज ॲनालॉग’? मेनू कार्डवर स्पष्ट लिहिणे आता बंधनकारक
पनीर की ‘चीज ॲनालॉग’? मेनू कार्डवर स्पष्ट लिहिणे आता बंधनकारक
Published on

कल्पेश म्हामुणकर/मुंबई

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’चा (वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनवलेले पनीरसदृश उत्पादन) वापर करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. हॉटेल चालकांनी पनीरच्या जागी अशा पर्यायी उत्पादनाचा वापर केल्यास त्याची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पनीर म्हणून मार्केटिंग केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये स्वस्त पर्यायांचा वापर करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हे आदेश दिले आहेत.

पनीर की ‘चीज ॲनालॉग’? मेनू कार्डवर स्पष्ट लिहिणे आता बंधनकारक
घरच्या घरी बनवा चटपटीत पनीर सँडविच; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

राज्यात २७ एप्रिल २०२६ पासून या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येणार असून १ मे पासून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू होईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, ज्यामध्ये परवाना रद्द करण्यापर्यंतच्या शिक्षेचा समावेश आहे.

विधिमंडळात आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. ‘चीज ॲनालॉग’ हे वनस्पती तेल आणि इतर बिगर-डेअरी घटकांपासून बनवले जाते, जे हुबेहूब पनीरसारखे दिसते. यामुळे ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आता मेनूकार्ड, बिले व इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर अशा वापराचा स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य असेल.

logo
marathi.freepressjournal.in