परभणीत सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू

परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली असून मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
परभणीत सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू
परभणीत सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू
Published on

परभणी : परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली असून मंदिरासमोरील सभागृहाचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे, तर ८ ते १० भाविक गंभीर जखमी झाले असून ३० ते ४० भाविक सभामंडपाच्या ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त आहे.

शनिवार असल्याने मारुती मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती, त्याच वेळी हा काळाने घाला घातला. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले जात आहे.

परभणीत सभामंडप कोसळून ६ जणांचा मृत्यू
Video : परभणीत भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या हनुमान मंदिराचे छत कोसळले; ५ भाविकांचा मृत्यू, १७ जण जखमी

सभागृहाचे छत पत्त्यांसारखे कोसळले

यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी जिल्हाभरातून आणि शेजारच्या भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. शनिवारी देखील सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत पत्त्यांसारखे कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये पळापळ सुरू झाली.

logo
marathi.freepressjournal.in