Pune : पार्थ पवारांच्या कंपनीचा ४० एकर जमीन खरेदीचा दस्त रद्द

पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचा ४० एकर जमीन खरेदीचा दस्त पुणे न्यायालयाने रद्द केला आहे.
Pune : पार्थ पवारांच्या कंपनीचा ४० एकर जमीन खरेदीचा दस्त रद्द
Pune : पार्थ पवारांच्या कंपनीचा ४० एकर जमीन खरेदीचा दस्त रद्दसंग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचा ४० एकर जमीन खरेदीचा दस्त पुणे न्यायालयाने रद्द केला आहे. शासकीय मालकीची आणि बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्त्वावर दिलेली ही जमीन सुमारे ३०० कोटी रुपयांना विकण्याचा करार करण्यात आला होता. या जमिनीची बाजारातील किंमत सुमारे १,८०० कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला असून, आयटी पॉलिसीचा गैरवापर करून सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क टाळत केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर व्यवहाराची नोंदणी झाल्याचा आरोप आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर अमेडिया कंपनीनेच हा खरेदी दस्त रद्द करण्यासाठी दिवाणी दावा दाखल केला होता. व्यवहारात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण झाली नसून जमिनीचा ताबाही देण्यात आला नसल्याचे दोन्ही पक्षांनी न्यायालयात मान्य केल्यानंतर न्यायालयाने दस्त रद्द करण्याचा निर्णय दिला.

दरम्यान, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या समितीने महसूल विभागातील गंभीर त्रुटी निदर्शनास आणत तत्कालीन उपनिबंधक रवींद्र तारू, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची शिफारस केली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in