पैठणमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्याने केली शेतकऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

ऊस थकबाकीच्या मागणीवरून झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत तिघेजण एका शेतकऱ्याला मारहाण करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.
पैठणमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्याने केली शेतकऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल
Published on

ऊस थकबाकीच्या मागणीवरून झालेल्या वादानंतर उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्याने शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत तिघेजण एका शेतकऱ्याला मारहाण करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पैठण तालुक्यात ठाकरे पक्षातील शिवसेना उपनेता सचिन घायाळ याने राहुल कांबळे या शेतकऱ्याला मारहाण केली. राहुल कांबळे या शेतकऱ्याने उसाच्या थकीत बिलाची मागणी केल्यानंतर सचिन घायाळने राहुलला घरी बोलावून तीन साथीदारांसह लाथाबुक्क्याने शिवीगाळ करत जबरदस्त मारहाण केली.

या घटनेमुळे स्थानिक परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पैठण पोलिस ठाण्यात सचिन घायाळ आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने आश्वासन दिले आहे की, कोणतीही बाजू न धरता निष्पक्ष तपास केला जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सामान्य शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी त्यांना स्थानिक नेत्यांकडून मारहाण होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in