
नाशिक : सातपूर परिसरातील गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरपीआय आठवले गटाच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा अखेर हातोडा पडला आहे. चार वर्षांपूर्वी नंदिनी नदीच्या पूरररेषेत बांधण्यात आलेली ही अनधिकृत इमारत महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.
शहरातील आयटीआय सिग्नल परिसरातील एका बारमध्ये खंडणी उकळवण्यासाठी गोळीबाराची घटना घडली होती, ज्यात एक जण गंभीर जखमी झाला. त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले गेले.
या घटनेनंतर प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याचे काही साथीदार यांच्यावर गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला, आणि नंतर लोंढे पिता-पुत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
लोंढेच्या इमारतीत भुयार आढळून आला, ज्यामध्ये शस्त्रास्त्रे आणि अलिशान बेडरूम असल्याचे निष्पन्न झाले. आता लोंढेच्या इमारतीचे पाडकाम झाल्यानंतर, परिसरातील झोपडपट्टीतील इतर अनधिकृत घरांनाही नोटीस पाठवून त्यावर देखील कारवाई सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.