Pune : आष्टापूरमध्ये ४० टन ऊस चोरी; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक

हवेली तालुक्यातील आष्टापूर गावातील शेतातून सुमारे ४० टन ऊस तोडून चोरी करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरलेला ऊस अंदाजे ८८ हजार रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune : आष्टापूरमध्ये ४० टन ऊस चोरी; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक
Pune : आष्टापूरमध्ये ४० टन ऊस चोरी; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : हवेली तालुक्यातील आष्टापूर गावातील शेतातून सुमारे ४० टन ऊस तोडून चोरी करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरलेला ऊस अंदाजे ८८ हजार रुपयांचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंढवा परिसरात राहणारे अनिल कामठे यांच्या कुटुंबाच्या मालकीची आष्टापूर येथील गट क्रमांक ८२२ मध्ये शेतजमीन आहे. कामठे आणि त्यांचे दोन भाऊ मिळून या जमिनीची शेती करतात. शेतातील सुमारे ५५ गुंठे क्षेत्रात सात महिन्यांपूर्वी उसाची लागवड करण्यात आली होती.

Pune : आष्टापूरमध्ये ४० टन ऊस चोरी; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक
Mumbai : १० व्या मजल्यावरून पडूनही तरुणी बचावली; भांडुप पश्चिम येथील घटना, VIDEO
Pune : आष्टापूरमध्ये ४० टन ऊस चोरी; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक
लासलगाव रेल्वे स्थानकात 'कांदा एक्सप्रेस' रोखली; प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकत्यांचे आंदोलन, ४२ तासांच्या विलंबानंतर अखेर दिल्लीकडे कूच

कामठे यांच्या आईची प्रकृती बिघडल्यामुळे ते आणि त्यांचे भाऊ मुंढवा येथील घरी गेले होते. या कालावधीत २० ते २३ ऑगस्टदरम्यान अज्ञात व्यक्तींनी ऊस मजुरांच्या मदतीने तोडून चोरून नेला. कामठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in