पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद

पुण्याच्या जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर लोखंडी कमान काढताना ती अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद
पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद(Photo - X)
Published on

पुणेः पुण्याच्या जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सव संपल्यानंतर लोखंडी कमान काढताना ती अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत झालेल्या दुर्देवी महिलेचे नाव आहे. विघ्नहर्ता मंडळाचा दहीहंडी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर उत्सवस्थळी उभारलेली लोखंडी कमान आणि त्याचा सांगाडा काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक लोखंडी कमानीचा एक भाग सलमा पठाण यांच्या डोक्यावर येऊन आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

पुण्यात दहीहंडीची कमान कोसळून महिला ठार, CCTV मध्ये घटना कैद
Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

दरम्यान, मृत सलमा पठाण यांचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळात काम करतो. यामुळे दुःख अनावर झाले असतानाही कुटुंबीयांनी मंडळाविरोधात कोणतीही कायदेशीर तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला. मंडळातील इतर तरुण व आपलीच मुले या प्रकरणामुळे अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. तसेच, पोलिसांनी याप्रकरणी स्वतःहून (सुमोटो) कोणताही गुन्हा दाखल करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in