पुण्यात बाप-लेकाचा फ्लॅटमध्ये मृत्यू

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील व्हिजन स्कूल परिसरातील खळबळजनक घटना समोर आली आहे.
पुण्यात बाप-लेकाचा फ्लॅटमध्ये मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील व्हिजन स्कूल परिसरातील खळबळजनक घटना समोर आली आहे. रॉयल काउंटी इमारतीमध्ये एका फ्लॅटमध्ये बाप लेकाचा संशयित मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

बुधवारी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी ही घटना उघडकीस आली. रॉयल काऊंटी मध्ये अरुण बबनराव पायगुडे (वय-६४) व त्यांचा मुलगा ओंकार अरुण पायगुडे (वय-३३) हे राहत होते. त्यांचे आपापसात वारंवार दारू पिउन भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांनी आणि वॉचमनने सांगितले.

गेल्या चार दिवसांपासून घराचे दार आतून बंद असल्याने शेजारच्या लोकांना संशय आला. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस दरवाजा तोडून आत गेले असता अस्ताव्यस्त पडलेले मृतदेह दिसून आले. पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले असून व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in