Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

दहा दिवसांच्या उत्सवाच्या जल्लोषानंतर आज (दि. ६) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९:३० वाजता सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात हजारो मंडळांच्या मिरवणुका निघणार असून, लाखो भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुणे पोलीसांनी कडक नियोजन केले आहे.
Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद
Published on

दहा दिवसांच्या उत्सवाच्या जल्लोषानंतर आज (दि. ६) अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९:३० वाजता सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात हजारो मंडळांच्या मिरवणुका निघणार असून, लाखो भाविक सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुणे पोलीसांनी कडक नियोजन केले आहे.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मिरवणूक मार्गांची पाहणी केली असून, प्रत्येक मंडळासाठी नोडल ऑफिसर नियुक्त केले आहेत. शहरातील ३,९५९ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका नियोजित वेळापत्रकानुसार काढल्या जातील. ढोल-ताशांच्या वादनासाठी ठरवलेले नियम काटेकोरपणे पाळावेत, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जड वाहनांना दोन दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

आज पुण्यातील 'हे' रस्ते बंद

मिरवणुकीदरम्यान पुण्यातील अनेक महत्त्वाचे रस्ते आज सकाळपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यात प्रमुख रस्त्यांचा समावेश -

  • शिवाजी रोड (काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक)

  • लक्ष्मी रोड (संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक)

  • बाजीराव रोड (सावरकर चौक ते फुटका बुरुज चौक)

  • कुमठेकर रोड (टिळक चौक ते चितळे कॉर्नर)

  • गणेश रोड (दारूवाला पुल ते जिजामाता चौक)

  • केळकर रोड (बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक)

  • टिळक रोड (जेधे चौक ते टिळक चौक)

  • शास्त्री रोड (सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज चौक)

  • जंगली महाराज रोड (झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक)

  • कर्वे रस्ता (नळस्टॉप ते खंडोजी बाबा चौक)

  • फर्ग्युसन रोड (खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट)

  • भांडारकर रस्ता (पी.वाय.सी. जिमखाना ते नटराज चौक)

  • सातारा रोड (व्होल्गा चौक ते जेधे चौक)

  • सोलापूर रोड (सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक)

  • प्रभात रोड (डेक्कन पोस्ट ऑफिस ते शेलारमामा चौक)

  • बगाडे रोड (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक)

  • गुरुनानक रोड (देवजीबाबा चौक ते गोविंद हलवाई चौक)

पर्यायी मार्ग आणि नो-पार्किंग व्यवस्था

  • मिरवणुका सुरू झाल्यानंतर जंगली महाराज रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, सोलापूर रोड, सातारा रोड, बाजीराव रोड, शास्त्री रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड अशा ठिकाणी वाहतुकीचे मार्ग वळवले जाणार आहेत.

  • नो-पार्किंग बंदी प्रामुख्याने लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड आणि फर्ग्युसन रोडवर असेल. तसेच खंडोजी बाबा चौकाजवळील १०० मीटर परिसरात पार्किंग बंदी असेल.

भक्तांसाठी विशेष सूचना

पुणे पोलिसांनी नागरिकांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन केले आहे. मिरवणुकीत शिस्त राखून शांततेत विसर्जन सोहळा पार पाडावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in