Pune : लंडनहून परतलेल्या तरुणीचा पुण्यात मृतदेह

उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेली आणि कुटुंबीयांशी संपर्कात नसलेली ३४ वर्षीय मुग्धा देशमुख हिचा मृतदेह पुण्यातील गहुंजे परिसरातील लॉढा बेलमोंडो येथील भाड्याच्या सदनिकेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Pune : लंडनहून परतलेल्या तरुणीचा पुण्यात मृतदेह
Pune : लंडनहून परतलेल्या तरुणीचा पुण्यात मृतदेह
Published on: 

पुणे : उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेली आणि कुटुंबीयांशी संपर्कात नसलेली ३४ वर्षीय मुग्धा देशमुख हिचा मृतदेह पुण्यातील गहुंजे परिसरातील लॉढा बेलमोंडो येथील भाड्याच्या सदनिकेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून, तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मूळची छत्रपती संभाजीनगर येथील असलेली मुग्धा एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. मात्र, कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता ती भारतात परतल्याचे तपासात समोर आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी तिचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क झाला होता. लंडनमधील एका मैत्रिणीशीही तिचा २२ ऑक्टोबर रोजी शेवटचा संदेशाद्वारे संपर्क झाल्याची माहिती आहे. दरम्यान,

ब्रिटनमधील पोलिसांनी ती ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटनमधून बाहेर पडल्याचे कुटुंबीयांना कळविले होते.

मुग्धाशी संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी तिच्या बँक खात्याचे व्यवहार तपासले. ८ त्यामध्ये ते २५ ऑक्टोबरदरम्यान खाद्यपदार्थांच्या ऑनलाइन ऑर्डरचे व्यवहार आढळले. यातील काही व्यवहार छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा परिसरातील असल्याचे निदर्शनास आले. या व्यवहारांच्या आधारे तपास करताना तिचे वास्तव्य पुण्यातील गहुंजे येथे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सदनिकेचा दरवाजा उघडण्यासाठी चावी तयार करणाऱ्याची मदत घेतली. सदनिकेत प्रवेश केल्यानंतर मुग्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

तिच्या शरीरावर प्रथमदर्शनी जखमांच्या खुणा दिसून आल्या नसल्याची माहिती आहे. मुग्धाने एप्रिल महिन्यात ही सदनिका भाड्याने घेतली होती आणि ऑगस्टपासून तेथे राहण्यास सुरुवात केली होती. ती लंडनहून भारतात कधी आणि कोणत्या कारणाने परतली, तसेच तिचा मृत्यू नेमका कधी व कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)