Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा

आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या एका चोरीच्या गैरप्रकारानंतर मंदिर संस्थान कमिटीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत.
Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा
Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा
Published on

पुणे : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात घडलेल्या एका चोरीच्या गैरप्रकारानंतर मंदिर संस्थान कमिटीने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. यापुढे मंदिरातील सुरक्षा व्यवस्था डिजिटल आणि हायटेक करण्यासाठी थेट 'कृत्रिम बुद्धिमत्ता' ('एआय') तंत्रज्ञान,फेस आणि थम्ब आयडी यंत्रणा आणि 'ईआरपी' सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत मंदिर संस्थांच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. परिषदेत प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, व्यवस्थापक माऊली वीर, तसेच पुरुषोत्तम महाराज लोंढे उपस्थित होते. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता.

Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा
Navi Mumbai : जेएनपीएत कोंडी; केंद्र सरकार सरसावले, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि सर्वानंद सोनोवाल यांच्याकडून आढावा

मंदिर प्रशासनाने विश्वासाने जबाबदारी दिलेल्या एका सेवेकऱ्यानेच दानपेटीतील रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी २५ मे २०२६ रोजी आळंदी कार्यालयात विश्वस्त मंडळाची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मंदिर व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी १५ कलमी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

हनुमान दरवाजातून ये-जा बंधनकारक

नव्या नियमांनुसार अन्नदान व कॅश मोजणीच्या ठिकाणी स्वयंसेवकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र आणि केवळ 'हनुमान दरवाजा'तूनच ये-जा करणे बंधनकारक केले आहे. याबाबतचा निर्णय कमिटीने घेतला आहे.

मंदिर संस्थान कमिटी
मंदिर संस्थान कमिटी

डिजिटल सुरक्षा आणि हायटेक तंत्रज्ञानाचा वापर

मंदिरातील गैरप्रकारानंतर प्रशासनाने सुरक्षेसाठी अत्यंत आधुनिक पावले उचलली आहेत. त्यानुसार संपूर्ण मंदिर परिसरात 'एआय' तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून, कॅश विभागात केवळ अधिकृत व्यक्तींनाच फेस आणि थम्ब बायोमेट्रिक द्वारे प्रवेश दिला जाईल. प्रशासकीय पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक 'ईआरपी ' सॉफ्टवेअर आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे 'जिओ ट्रॅकिंग' हजेरी सुरू करण्यात येत आहे. याशिवाय, सर्व कर्मचाऱ्यांना रोज व्हॉट्सॲप ग्रुपवर स्वतःचे लोकेशन आणि फोटोसह लॉग-इन व लॉग-आऊट करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in