Pune : मोशी कचरा डेपो दुर्घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुली पोरक्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्यानंतर काही आठवड्यांतच पत्नीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Pune : मोशी कचरा डेपो दुर्घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुली पोरक्या
Pune : मोशी कचरा डेपो दुर्घटना; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या, दोन चिमुकल्या मुली पोरक्याप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाल्यानंतर काही आठवड्यांतच पत्नीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोनाली नागेश गायकवाड (२३) यांनी १२ ऑगस्ट रोजी रात्री मोशी परिसरातील संजय गांधी नगर झोपडपट्टीतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात चार आणि दोन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोनाली या दोन्ही मुलींसह राहत होत्या. त्यांचे पती नागेश गायकवाड हे मोशी कचरा डेपोमध्ये मजूर म्हणून काम करत होते. ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सोनाली यांच्यावर आली होती.१२ ऑगस्टच्या रात्री चार वर्षांची मुलगी काही वेळासाठी घराबाहेर गेली होती, तर दोन वर्षांची मुलगी पाळण्यात झोपली होती. त्याचदरम्यान सोनाली यांनी टोकाचे पाऊल उचलले. मुलगी घरी परतल्यानंतर दरवाजा उघडला जात नसल्याने नातेवाईक व शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता सोनाली मृतावस्थेत आढळल्या. दोन वर्षांची मुलगी पाळण्यात झोपलेली होती.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. सोनाली यांनी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. पतीच्या मृत्यूचा धक्का आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे ही घटना घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले जात असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in