Pune : सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
Pune : सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील
Pune : सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील
Published on

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सिया गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच, आता तिच्या वडिलांच्या व्यवसायावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड भागातील त्यांचे दुकान विनापरवाना सुरू असल्याचे समोर आल्यानंतर ते तत्काळ सील केले. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण राज्यात दूषित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबवली जात आहे.

याच मोहिमेंतर्गत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील सियाच्या वडिलांच्या 'बी. जी. गोयल अँड कंपनी' या मसाल्याच्या दुकानावर अचानक धाड टाकली.

या कारवाईदरम्यान दुकानातील अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका ठेवला आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई करत तब्बल ४ हजार १७२ किलोचा साठा जप्त केला असून, या जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८ लाख १४ हजार ६३० रुपये इतकी आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in