Pune : मंगेशकर रुग्णालयात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका सहा वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Pune : मंगेशकर रुग्णालयात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू
Pune : मंगेशकर रुग्णालयात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू
Published on

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका सहा वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवसेनेने जोरदार आंदोलन केले.

Pune : मंगेशकर रुग्णालयात चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू
Mumbai : भांडुपमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, ९ जण जखमी, VIDEO व्हायरल

प्रियांशी बागडे असे या मृत बालिकेचे नाव असून, ती पारनेर तालुक्यातील सुपे येथील रहिवासी होती. प्रियांशीला डोळ्यांतील तिरळेपणाचा त्रास असल्याने त्यावर उपचार करण्यासाठी तिला या रुग्णालयात दाखल केले.

मात्र, शस्त्रक्रियेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये प्रियांशीच्या डोळ्यांत औषधी ड्रॉप टाकल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्याने तातडीने अतिदक्षता विभागात हलवले, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रक्रियेदरम्यान रुग्णालय प्रशासनाने पालकांना माहिती दिली नाही.

logo
marathi.freepressjournal.in