गर्ल्स हॉस्टेलमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेटच्या पाकिटांचा खच; पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनीनेच समोर आणली गंभीर घटना

'शिक्षणाचं माहेरघर' म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातील नामवंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील (SPPU) मुलींच्या वसतीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गर्ल्स हॉस्टेलमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेटच्या पाकिटांचा खच; पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनीनेच समोर आणली गंभीर घटना
गर्ल्स हॉस्टेलमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेटच्या पाकिटांचा खच; पुणे विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थिनीनेच समोर आणली गंभीर घटना फोटो सौजन्य : विशेष व्यवस्था
Published on

'शिक्षणाचं माहेरघर' म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातील नामवंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील (SPPU) मुलींच्या वसतीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्ल्स हॉस्टेमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्य आणि धूम्रपान केले जात असल्याचे उघड झाले आहे. वसतीगृहातील एका मुलीने काही फोटो आणि व्हिडिओ काढून हा प्रकार उघडकीस आणला असून फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

वारंवार वॉर्डनकडे तक्रार करुनही कारवाई नाही

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर मद्यपान आणि धूम्रपान करत असल्याचा आरोप आहे. एका विद्यार्थिनीने याचा पुरावा म्हणून फोटो आणि व्हिडिओ घेतले आहेत. सदर विद्यार्थिनीने याबाबत वारंवार वॉर्डनकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अखेर विद्यार्थीनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरूंना पत्र लिहून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

तीव्र आंदोलनाचा इशारा

या प्रकारामुळे अभाविप ही विद्यार्थी संघटना आक्रमक झाली आहे. आरोपी विद्यार्थ्यांविरोधात योग्य कारवाई करण्यात आली नाही आणि विद्यापीठ परिसर नशामुक्त करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) दिला आहे.

दरम्यान, मुलींच्या वसतिगृहातील खोल्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ड्रॉवरमध्ये, पिशव्यांमध्ये भरलेली सिगारेटची भरमसाठ पाकिटे आणि अनेक मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. मुलींच्या वसतीगृहातील या गंभीर प्रकारामुळे चिंता व्यक्त होत आहे. तथापि, विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in