
मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी राज्य सरकारने उपसमितीचे पुनर्गठन केले आहे.
उपसमितीमार्फत मराठा आरक्षणविषयक प्रशासकीय आणि वैधानिक कामकाजाचा समन्वय ठेवण्यात येणार आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणांमधील शासनाच्या बाजूने मांडण्यासाठी नेमलेल्या समुपदेशींशी समन्वय ठेवण्यात येणार आहे, तसेच विशेष समुपदेशींना समितीकडून सूचना दिल्या जाणार आहेत. न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची कार्यपद्धती उपसमितीकडून ठरविली जाणार आहे.