मनसे-भाजप युतीबाबत रामदास आठवले यांनी भाजपला दिला 'हा' इशारा
ANI

मनसे-भाजप युतीबाबत रामदास आठवले यांनी भाजपला दिला 'हा' इशारा

भाजपने स्वतंत्रपणे लढावे. मी त्यांच्यासोबत आहे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर मोकळेपणाने आपले मत मांडले.

भाजपला प्रत्यक्षात मनसेची गरज नाही. भाजप-मनसे युती झाल्यास भाजपला फायद्यापेक्षा तोटाच सहन करावा लागेल. भाजपने राज ठाकरेंना जवळ केले तर भाजपला राष्ट्रीय स्तरावर मोठा फटका बसू शकतो, असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या घरी भाजप-शिंदे सेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आदी नेत्यांनी भेट घेतली. यावर TV९ या चॅनेलला दिलेल्या मुलाखती दरम्यान रामदास आठवले म्हणाले की, गणपतीला घरी जायला हरकत नाही. भेटीसाठी जा... मात्र राजकीय युती करू नये... मनसेला स्वतंत्र लढू द्यावे. तो एक स्वतंत्र पक्ष आहे. अशा युतीमध्ये भाजपला फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो. दलित समाजातही गैरसमज पसरू शकतात. भाजपने स्वतंत्रपणे लढावे. मी त्यांच्यासोबत आहे, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर मोकळेपणाने आपले मत मांडले.

MNS & BJP : अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात भेट ? नक्की काय शिजतंय ?


राज ठाकरे यांचे वैयक्तिक कौतुक करताना रामदास आठवले म्हणाले, 'राज ठाकरे हे चांगले नेते आहेत. सभेला गर्दी होतात, पण त्यांना मते मिळत नाहीत. त्यामुळे भाजपने राज ठाकरेंना सोबत घ्यावे असे मला वाटत नाही. राज ठाकरे यांची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतील इतर लोकांच्या विरोधात भूमिका घेतल्याने भाजपला हे परवडणारे नाही. भाजपने शिंदेगट आणि मनसेला सोबत घेतल्यास तुमचा पक्ष बाजूला होईल का, असे विचारले असता रामदास आठवले म्हणाले, मी बाजूला होणार नाही. मी मध्यभागी उभा राहीन.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in