Rohit Pawar : आजोबांपाठोपाठ आता नातू रोहित पवार क्रिकेटच्या मैदानात

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या कित्येक वर्षात क्रिकेटशी संबंधित अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत.
Rohit Pawar : आजोबांपाठोपाठ आता नातू रोहित पवार क्रिकेटच्या मैदानात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि क्रिकेट हा इतिहास देशातील सर्वांनाच ज्ञात आहे. अशामध्ये आता त्यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील क्रिकेटच्या मैदानात प्रवेश केला आहे. आधी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांची असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

आजोबा शरद पवार यांच्या पाठोपाठ आता रोहित पवार यांची क्रिकेटच्या मैदानात दमदार एंट्री झाली आहे. आज असोशिएशनच्या कमिटीची बैठक पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये पार पडली. यामध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवार यांचीदेखील निवड झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in