भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं आज बारामतीत सुप्रिया सुळे यांची सांगता सभा पार पडली. या सभेत आमदार रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार
रोहित पवार रोहित पवार

बारामती : यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. राष्ट्रवादी पक्षातील उभ्या फूटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत सुप्रिया सुळे यांची सांगता सभा पार पडली. या सभेत बोलताना आमदार रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

अन् रोहित पवार स्टेजवरच रडले...

सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आम्हाला सुप्रिया ताईंना देशाच्या कृषीमंत्री म्हणून बघायचंय, असंही ते म्हणाले. या सभेदरम्यान रोहित पवारांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडीओत चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

यावेळी बोलताना रोहित पवार भावूक झाले आणि त्यांना स्टेजवरचं रडू कोसळलं. दरम्यान रोहित पवार यांच्या आई सुनंदा आणि पत्नी कुंती पवार देखील भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना:

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या मंगळवारी (7 मे) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानं इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार गटासह महाविकास आघाडीनं तर सुनेत्रा पवारांसाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार ताकद लावल्याचं पाहायला मिळालं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in