कलाटेंची समजूत काढायला गेले सचिन अहिर, उद्धव ठाकरेंशी करून दिली चर्चा; तरीही सस्पेन्स कायम

आज पुणे पोटनिवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सचिन अहिर हे चिंचवड विधानसभेत बंडखोरी करणारे राहुल कलाटेंच्या दारी गेले
कलाटेंची समजूत काढायला गेले सचिन अहिर, उद्धव ठाकरेंशी करून दिली चर्चा; तरीही सस्पेन्स कायम

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी दिली. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी कलाटेंची भेट घेत त्यांची समजूत काढली. तसेच, उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून दिली. मात्र, अद्यापही यावर सस्पेन्स कायम असून ते उमेदवारी मागे घेणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

माध्यमांशी बोलताना राहुल कलाटे म्हणाले की, "चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर मला आज भेटले. मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही, पण माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही? यावर मी यावर निर्णय जाहीर करेन." असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. यावेळी सचिन अहिर म्हणाले की, "उध्दव ठाकरेंशी कलाटे यांचे बाेलणे झाले आहे. कलाटेंना, तुम्ही शांत डाेक्याने विचार करा असे सांगितले आहे. ते अर्ज मागे घेतील याबाबत आम्ही आशावादी आहोत. महाविकास आघाडीसोबत ते राहतील असे आम्हाला वाटते. संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी देखील मी बाेलणार आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती करणार आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in