महाराष्ट्र
सागर यादव खून प्रकरण; आणखी तीन आरोपींना अटक
आरोपींकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
नांदेड : सराफा लाईन येथे ६ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास सागर यादव याचा खून झाल्याची घटना घडली होती. या गुन्हयातील आणखी तीन आरोपींना ३० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून अटक केली आहे. आकाश गोविंदराव लुळे (२१), दिपक अर्जुन पवार (२१) व पप्पु शेषेराव गजलवाड (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थागुशाच्या पथकाने चिंबळी (ता. खेड जि. पुणे) येथे जात स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सापळा रचून तिघांना अटक केली. या तिघांनी गुन्हा केल्याचे सांगीतल्याने त्यांना पुढील तपासकामी इतवारा ठाण्यात देण्यात आले आहे. तसेच सदरील आरोपी हे विमानतळ पोलिसांचा एका गुन्ह्यात पाहिजे होते. त्यामुळे आरोपींकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.