Chhatrapati Sambhajinagar : भररस्त्यात धिंगाणा! दारूड्याने वाहतूक पोलिसावर उचलला हात, पत्नीनेही घातली हुज्जत; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दारुड्याने आणि त्याच्या पत्नीने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत भररस्त्यात गोंधळ घातला. मद्यधुंद अवस्थेतील त्या व्यक्तीने थेट वर्दीवर हात उचलत एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाणही केली. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar : भररस्त्यात धिंगाणा! दारूड्याने वाहतूक पोलिसावर उचलला हात, पत्नीनेही घातली हुज्जत; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा
Published on

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दारुड्याने आणि त्याच्या पत्नीने ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत भररस्त्यात गोंधळ घातला. एवढ्यावरच न थांबता मद्यधुंद अवस्थेतील त्या व्यक्तीने थेट वर्दीवर हात उचलत एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाणही केली. येथील हायकोर्ट सिग्नलवर हा प्रकार घडला. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

सोमनाथ मुरलीधर गिरी (२७) आणि अनिता सोमनाथ गिरी (२५) अशी आरोपींची नावे आहेत. गिरी दाम्पत्य हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चंदननगर येथील रहिवासी असून सध्या ते शहरातील विजयनगर परिसरात राहतात.

रविवारी, वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल रावसाहेब पाचोरे आणि संतोष खरात हे हायकोर्ट ट्रॅफिक सिग्नलवर ड्युटीवर होते. दुपारी ४.३० च्या सुमारास, सोमनाथ गिरी आणि त्यांची पत्नी अनिता मोटारसायकलवरून (MH17 CQ 6742) जात होते. पण, दुभाजकाच्या अगदी जवळून धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवत असल्यामुळे रावसाहेब यांनी त्यांना थांबवले. सोमनाथ दारू पिऊन असल्याचे आढळून आले. पोलिसांनी विचारणा करताच सोमनाथने संतापून पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि एका कर्मचाऱ्याला मारहाणही केली. बराचवेळ तो आणि त्याची पत्नी पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालत होते. थोड्यावेळाने तो थेट रस्त्यावरच आडवा झाला. परिणामी काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. 

पोलिसांची कारवाई

बराच वेळ समजावूनही दाम्पत्य ऐकायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पुंडलिकनगर पोलिस आणि दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले. पाचोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, गिरी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in