तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असणारे संजय राऊत यांची सुटका ; न्यायालयाने ईडीला फटकारले

यावेळी पीएमएलए कोर्टाने ईडीचेही कान टोचले आहेत. संजय राऊत यांना ईडीने कोणतेही कारण नसताना अटक केल्याचे नमूद केले
तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असणारे संजय राऊत यांची सुटका ; न्यायालयाने ईडीला फटकारले

तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात असलेले ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. 31 जुलै 2022 रोजी राऊत यांना अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. यानंतर राऊत यांच्या जामीन अर्जांना ईडीकडून न्यायालयात वारंवार विरोध करण्यात आला. अखेर आज न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. शिवाय, यावेळी पीएमएलए कोर्टाने ईडीचेही कान टोचले आहेत. संजय राऊत यांना ईडीने कोणतेही कारण नसताना अटक केल्याचे नमूद केले. 

न्यायालयाने ईडीला फटकारले

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पीएमएलए कोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे. यावेळी दिलेल्या आदेशात न्यायालयाने दोन्ही आरोपींना बेकायदेशीररित्या अटक केल्याचे नमूद केले आहे.

Bail Granted To Sanjay Raut : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in