शिवाजीराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली
शिवाजीराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला; डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदाचा कार्यभार महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. याप्रसंगी विभागीय संपर्क नेते संजय माशीलकर, इरफान सैय्यद, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, बाळासाहेब वाल्हेकर, सुरेंद्र जेवरे, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, महिला शहर प्रमुख पूजा रावेतकर, कांताताई पांढरे, नगरसेवक लक्ष्मण आरडे, युवासेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, पुणे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले अभिजीत बोऱ्हाडे म्हाडाचे कार्यकारी अधिकारी अशोक पाटील आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केले जाईल, याचा विश्वास आहे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in