यवतमाळमध्ये धक्कादायक घटना; तिसरीतल्या विद्यार्थ्याने वर्गातील मुलीवर केला लैंगिक अत्याचार; वर्गमैत्रिणीनेच केली मदत

यवतमाळ जिल्ह्यातील बाबुलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ९ वर्षीय मुलाने आपल्या वर्गातील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र
Published on

यवतमाळ जिल्ह्यातील बाबुलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ९ वर्षीय मुलाने आपल्या वर्गातील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने वर्गमैत्रिणीच्या मदतीने शाळेच्या शौचालयात हे कृत्य केले. पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना ताब्यात घेतले असून बालसुधारगृहात पाठवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय ८ वर्ष) आणि दोन्ही आरोपी विद्यार्थी हे तिघेही इयत्ता तिसरीमध्ये शिकत होते. ही घटना १ ऑगस्ट रोजी शाळेत घडली. काही दिवसांपूर्वी पीडितेला गुप्तांगात वेदना होत असल्याने तिने आईकडे तक्रार केली. आईने तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गुप्तांगावर जखमा असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी पीडितेने वर्गातील मुलाने दुसऱ्या मुलीच्या मदतीने शौचालयात अत्याचार केल्याचे सांगितले.

यानंतर ९ ऑगस्ट रोजी पीडितेच्या आईने बाबुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता व POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले की, ''हे प्रकरण गंभीर असून ९ वर्षीय मुलाने गुन्हा केला आहे आणि ९ वर्षीय दुसऱ्या मुलीने त्याला मदत केली आहे. सध्या दोन्ही आरोपी मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.''

logo
marathi.freepressjournal.in