सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज; मुरलीधर मोहोळ, शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही भरणार अर्ज

महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे गुरुवारी भरणार उमेदवारी अर्ज; मुरलीधर मोहोळ, शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही भरणार अर्ज

पुणे : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडी सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. या नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या गन्ही उमेदवार गुरुवारी १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज पुण्यात भरणार आहेत.

महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निमित्ताने महायुतीच्या वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या दिवशी महायुतीची जाहीर सभाही पुण्यात होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in