सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार की छगन भुजबळ... राज्यसभेत कुणाला मिळणार संधी? अजित पवार गटाकडून उद्या सकाळी होणार घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे.
सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार की छगन भुजबळ... राज्यसभेत कुणाला मिळणार संधी? अजित पवार गटाकडून उद्या सकाळी होणार घोषणा
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा उद्या सकाळी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रफुल पटेल यांची जागा रिक्त झाल्यामुळं त्यांच्याजागी कुणाची वर्णी लागणार हे पाहणं, औत्युक्याचं ठरणार आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

उमेदवाराची उद्या सकाळी होणार घोषणा:

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना राष्ट्रवादीचा राज्यसभेसाठीचा अधिकृत उमेदवार उद्या सकाळी घोषित करणार असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळत आहे.

सुनेत्रा वहिनींना राज्यसभेला संधी द्या...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील आमदारांनी अजित पवार यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रात मंत्री करावं, अशी मागणी शरद पवार आणि अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीच्या गावकऱ्यांनी काल केली होती. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळ मिळेल. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पत राखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर नियुक्ती झाली पाहिजे, असं काटेवाडी म्हणणं आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in