सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या मतदारांना घातली भावनिक साद; कुटुंबातील सदस्याविरोधातील संघर्षाबाबत पत्रातून मांडली बाजू

आपल्या नणंदेविरोधात म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावनिक साद देत आपली बाजू मांडत मतदारांना आवाहन केले आहे.
सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या मतदारांना घातली भावनिक साद; कुटुंबातील सदस्याविरोधातील संघर्षाबाबत पत्रातून मांडली  बाजू

मुंबई : कुटुंबातील एक ज्येष्ठ महिला सदस्य म्हणून, निवडणुकीतील हा संघर्ष मला पटत नाही परंतु, कर्तव्यतसेच प्रत्येकाच्या हिताचा विचार करून हा व्यापक दृष्टीकोन आवश्यक आहे, असे सांगत बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मतदारांना साकडे घातले आहे.

आपल्या नणंदेविरोधात म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावनिक साद देत आपली बाजू मांडत मतदारांना आवाहन केले आहे. पत्रात त्यांनी सांगितले की, राजकारणात प्रवेश करणे आणि तेही माझ्या कुटुंबातील सदस्याविरुद्ध हे सुरुवातीला माझ्यासाठी स्वीकारणे कठीण वास्तव होते. माझ्या पतीने एक नवीन राजकीय भूमिका घेतली आहे जी केवळ त्यांचीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवासाशी जवळून संबंधित असलेल्या सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनीही घेतली आहे. विकासाच्या राजकारणाच्या या सिद्धांताचा पुरस्कार पवार कुटुंबाने केला आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यांनी १८ एप्रिल रोजी अर्ज भरण्यापूर्वी हे पत्र जारी केले. सुनेत्रा पवार यांनीही त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना सोडून जाण्याच्या त्यांच्या पतीच्या निर्णयाचा जोरदार बचाव केला आणि म्हणाल्या, हा निर्णय पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातील बहुसंख्य आमदार आणि खासदारांनी घेतला आहे. हा निर्णय साहेबांच्या विरोधात नव्हता. पण त्यापूर्वी पक्षाने घेतलेल्या भूमिकेशी सुसंगतपणे अजित पवार यांनी विकासाच्या या सिद्धांताला अनुसरून निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in