पदोन्नतीवरून तहसीलदार संतप्त; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आज भेट घेणार

महसूल विभागाने सेवा ज्येष्ठता यादीत केलेल्या तांत्रिक चुकांचा फटका पुणे विभागातील २० तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना बसला आहे.
पदोन्नतीवरून तहसीलदार संतप्त; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आज भेट घेणार
पदोन्नतीवरून तहसीलदार संतप्त; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आज भेट घेणारसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महसूल विभागाने सेवा ज्येष्ठता यादीत केलेल्या तांत्रिक चुकांचा फटका पुणे विभागातील २० तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना बसला आहे. या चुकीमुळे सन २०१३ नंतरच्या तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र, २०१३ आधीच्या तुकडीतील तहसीलदार अजूनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे अधिकारी बुधवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन पदोन्नतीतील अन्याय दूर करण्याची मागणी करणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २००४ मध्ये २० अधिकाऱ्यांची नायब तहसीलदारपदी निवड केली होती. या २० अधिकाऱ्यांना पुढे तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली. २०२३ मध्ये विभागाच्या तांत्रिक चुकांमुळे तहसीलदारांच्या सेवाज्येष्ठता यादीत घोळ झाला. त्यामुळे २००७मध्ये नायब तहसीलदार म्हणून निवड झालेले अधिकारी २०१४ नंतर तहसीलदार झाले. मात्र, पुणे विभागातील हे २० अधिकारी अजूनही तहसीलदार पदावर आहेत.

पदोन्नतीवरून तहसीलदार संतप्त; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आज भेट घेणार
दुसरीकडे मोक्याच्या पदांवर जाऊन बसणे बंद; महसूल अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केवळ तीन वर्षांसाठी

तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचा प्रस्ताव

पुणे विभागातील २० तहसीलदारांची सेवाज्येष्ठता यादीमधील झालेली तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी महसूल विभागाला सादर केला आहे. या प्रस्तावानुसार सेवाज्येष्ठता यादी दुरुस्त करून २० तहसीलदारांना पदोन्नती देण्याऐवजी तुलनेने कनिष्ठ असलेल्या ५१ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा घाट घालण्यात आल्याचा समजते.

logo
marathi.freepressjournal.in