ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; नागपूरच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र

अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणगीची लूट झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा गटाने छेडलेल्या रामरक्षा आंदोलनाचा पुढचा टप्पा शनिवारी नागपूर येथे पार पडत आहे.
ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; नागपूरच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र
ठाकरे गटाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; नागपूरच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्र
Published on

मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणगीची लूट झाल्याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा गटाने छेडलेल्या रामरक्षा आंदोलनाचा पुढचा टप्पा शनिवारी नागपूर येथे पार पडत आहे. यानिमित्ताने रामभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्यासाठी ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

श्रीराम मंदिरातील भक्तांनी दिलेल्या देणगीची चोरी झाल्याचे उघड झाल्यानंतर ठाकरे गटाने महाआरती आणि रामरक्षा आंदोलन सुरू केले. ५ जुलै रोजी दादर येथे आंदोलन केल्यानंतर आता १८ जुलैला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संध्याकाळी साडेचार वाजता नागपूरच्या राम मंदिरात आंदोलन होत आहे. मुख्यमंत्र्यांनी रामरक्षा उपक्रमात आवर्जून सहभागी होऊन रामभक्तांना शुभेच्छा द्याव्यात, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

वांगचुक आणि दिपकेंना ठाकरे गटाचा पाठिंबा

देशभरातील तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी आणि निष्ठूर भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी येत्या १९ जुलैला एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे गटाने केले आहे. रविवार, १९ जुलैला शिवाजी पार्क येथे (शिवतीर्थ) माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ संध्याकाळी ४ वाजता भेटूया, असे आवाहन शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in