Reel बनवण्याच्या नादात जीव गेला, ३५० फूट खोल दरीत पडून ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा मृत्यू

Reel Star Aanvi Kamdar: इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल संबंधित कॉन्टेन्ट पोस्ट करणारी अन्वी कामदार हीचा रील बनवताना अपघात होऊन मृत्यू झाला आहे.
Reel बनवण्याच्या नादात जीव गेला, ३५० फूट खोल दरीत पडून ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा मृत्यू
@theglocaljournal/ Instagram
Published on

Aanvi Kamdar Death: १६ जुलै रोजी मुंबईची रहिवासी असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अन्वी कामदार (२७) हिचा महाराष्ट्रातील रायगडजवळील कुंभे धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करताना दरीत पडून दुःखद मृत्यू झाला. अन्वी एक प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर होती आणि मुख्यतः ट्रॅव्हल संबंधित व्हिडीओ ती पोस्ट करायची. मंगळवारी आपल्या मैत्रिणींसोबत रीलचे चित्रीकरण करत असताना अन्वी कामदार ३५० फूट दरीत पडली.

ती ७ लोकांसोबत पिकनिकसाठी गेली होती. सहा तासांच्या बचावकार्यानंतर अन्वी कामदारला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

अन्वी कामदार कशी पडली?

अन्वी कामदार रील शूट करताना ३५०फूट खोल दरीत पडली. रायगडजवळील कुंभे धबधब्यावर हा अपघात झाला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्यावर फिरायला गेली होती. ती रील बनवत असताना अचानक तिचा पाय घसरला. त्यामुळे ती खोल दरीत पडली. ६ तास बचाव कार्य सुरु होते.

तटरक्षक दलासह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त मदत मागितली गेली. अन्वी खोल दरीत सापडल्यावर रॅपलिंग दोरीला जोडलेल्या स्ट्रेचरचा वापर करून तिला वर पाठवण्यात आले. त्यानंतर तिला तातडीने माणगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिला जबर जखमा झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु अन्वीला वाचवता आले नाही.

कोण आहे अन्वी कामदार?

अन्वीला प्रवासाची आवड होती. या आवडीला तिने आपले करिअर बनवले होते. अन्वी कामदारचे इंस्टाग्रामवर दोन लाख २७१ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. इंस्टाग्रामवर तिच्या बायोमध्ये स्वतःची ओळख करून देत अन्वीने 'ट्रॅव्हल डिटेक्टिव' असे लिहिले आहे. अन्वीला फिरण्याची आणि चांगल्या ठिकाणांची माहिती देण्याची आवड होती.

logo
marathi.freepressjournal.in