... तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयोगशाळांच्या कामकाजाच्या वेळा वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अन्न व औषधांच्या नमुन्यांची तपासणी करणाऱ्या सरकारी प्रयोगशाळांनी भविष्यात चोवीस तास (२४x७) काम केले पाहिजे.
... तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा
... तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा (संग्रहित छायाचित्र)
Published on

अमित श्रीवास्तव/मुंबई

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) प्रयोगशाळांच्या कामकाजाच्या वेळा वाढवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अन्न व औषधांच्या नमुन्यांची तपासणी करणाऱ्या सरकारी प्रयोगशाळांनी भविष्यात चोवीस तास (२४x७) काम केले पाहिजे. नवीन सुधारित व्यवस्थेनुसार काम करण्याची इच्छा नसलेले कर्मचारी राजीनामा देऊ शकतात, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे कामाचा प्रचंड ताण, वीकेंड व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सक्तीचे काम आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याबाबत तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ही भूमिका मांडली आहे.

वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्यावर परिणाम

कर्मचाऱ्यांनी १५ जुलैला दिलेल्या निवेदनात नवीन दोन-सत्र (टू-शिफ्ट) पद्धतीला विरोध दर्शवला होता. या आधी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी असलेली कार्यालयीन वेळ बदलून आता सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी १२ ते रात्री ८ अशा दोन सत्रांत काम चालते. या नवीन वेळापत्रकामुळे शनिवार, तसेच कधी कधी रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही काम करावे लागत असल्याने वैयक्तिक व कौटुंबिक आयुष्याचा समतोल बिघडल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला होता.

अतिरिक्त कामाचा ताण

प्रयोगशाळेत विश्षक (ॲनालिस्ट), प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक कर्मचारी आणि मदतनीस यांची कमतरता आहे. यामुळे ‘इंडियन, ब्रिटिश आणि युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया’च्या मानकांनुसार नमुन्यांची तपासणी करणे आणि प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करणे कठीण होत असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना मुंढे यांनी सांगितले की, राज्यभरात अन्न भेसळ व असुरक्षित उत्पादनांविरोधात मोहीम तीव्र केली आहे.

... तर कर्मचारी राजीनामा देऊ शकतात! FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा
माणसे कमी, कामाचा वाढता ताण; FDA प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या मंत्र्यांकडे तक्रारी

सरकारी कार्यालयांसारखे चालू शकत नाही

सरकारी प्रयोगशाळांचे काम सामान्य सरकारी कार्यालयांसारखे चालू शकत नाही, यावर भर देत मुंढे म्हणाले, ‘प्रयोगशाळा फक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मर्यादित ठेवता येत नाहीत. सध्या आम्ही आठवड्यातून सहा दिवस दोन सत्रांत काम सुरू केले आहे. गरज भासल्यास तपासणीचा वेग वाढवण्यासाठी आणि वेळेत कारवाई निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळा २४ तास चालवाव्याच लागतील.

नियमाला धरूनच कामकाज

हे सर्व आरोप फेटाळून लावताना आयुक्त मुंढे म्हणाले की, या नवीन व्यवस्थेमुळे कोणत्याही कर्मचाऱ्याचे वैयक्तिक कामाचे तास वाढलेले नाहीत. ‘प्रत्येक कर्मचारी दिवसातून केवळ आठ तासांची एकच शिफ्ट करतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नियमांनुसार आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम कोणाकडूनही करून घेतले जात नाही. कर्मचाऱ्यांना एक दिवस साप्ताहिक सुट्टीही दिली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in