वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’ आघाडीत सामिल होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने उत्सुकता वाढली

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे VBA ला इंडिया आघाडीत सामाविष्ट करुन घेतले जात नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. तसेच अतापर्यंत जरी काँग्रेस-राष्ट्रवादीने विचार केला नसला तरी इंडिया आघाडीकडून आम्हाला सहभागी करुन घेतले जाईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.
वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’ आघाडीत सामिल होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने उत्सुकता वाढली

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची ‘वंचित बहुजन आघाडी’ ही देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (I.N.D.I.A) आघाडीत सामील होणार की नाही. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतात. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. मात्र, पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे याबाबतची उत्सूकता जास्त वाढली आहे. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सामिल करुन घ्यायला हवे, असे मी स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितले आहे. मात्र, प्रत्येकाला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. पुण्यात आयोजित केलेल्या भीमथडी यात्रेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन वेगळा प्रयोग करावा अशी भूमिका अनेकजण मांडताना दिसतात. मात्र, अद्याप हे समिकरण जुळले नाही. तसेच देशपातळीवर झालेल्या इंडिया आघडीत तरी VBA ला स्थान मिळेल, असे अनेकांना वाटले होते. पण, त्याउलट वंजित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे VBA ला इंडिया आघाडीत सामाविष्ट करुन घेतले जात नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. तसेच अतापर्यंत जरी काँग्रेस-राष्ट्रवादीने विचार केला नसला तरी इंडिया आघाडीकडून आम्हाला सहभागी करुन घेतले जाईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता.

दुसरीकडे वंजित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी देखील काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली होती. आम्ही तुम्हाला संधी दिली होती. पण ती तुम्ही घेतली नाही. आता पुन्हा रडत येऊ नका, रडत आला तर ठोकून काढू, असा इशारा सुजात यांनी नांदेडच्या कंधार-लोह विधानसभा मतदार संघात झालेल्या निर्धार मेळाव्यात दिला होता.

 प्रकाश आंबेडकर यांनी देखील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, काँग्रेसकडून त्यावर अद्याप कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नसल्याचेही सुजात यांनी सांगितले होते.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यातील किमान ३० जागा लढवण्याचा विचार करत आहे. उद्या(२६ डिसेंबर) रोजी याबाबत चर्चा करण्यासाठी राज्य कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.  

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in