वर्ध्यात शेतीचा वाद ठरला जीवघेणा; पुतण्याने कुऱ्हाडीने केली काकू-चुलत भावाची हत्या, त्यानंतर घरी येऊन...

वर्ध्यात शेतीच्या मालकी आणि उत्पन्नाच्या वाटपातून उभा राहिलेला वाद शेवटी तिघांच्या मृत्यूचं कारण ठरला. शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमसडा गावात २८ जून रोजी सकाळी ९ ते ९.३० दरम्यान घडली. त्यानंतर त्याने घरी येऊन स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली.
वर्ध्यात शेतीचा वाद ठरला जीवघेणा; पुतण्याने कुऱ्हाडीने केली काकू-चुलत भावाची हत्या, त्यानंतर घरी येऊन...
Published on

वर्ध्यात शेतीच्या मालकी आणि उत्पन्नाच्या वाटपातून उभा राहिलेला वाद शेवटी तिघांच्या मृत्यूचं कारण ठरला. शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केली. ही धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमसडा गावात २८ जून रोजी सकाळी ९ ते ९.३० दरम्यान घडली. त्यानंतर त्याने घरी येऊन स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने निमसडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हत्येत मृत्यू झालेल्यांची नावे साधना सुभाष मोहिजे (वय ४५) आणि नितीन सुभाष मोहिजे (वय २८) अशी आहेत. तर, आरोपी महेंद्र भाऊराव मोहिजे (वय ४७) हा साधना यांचा पुतण्या आणि नितीनचा चुलत भाऊ होता.

वादातून भयंकर थरार -

गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून महेंद्र आणि नितीनमध्ये वाद सुरू होता. गावातील काही जमिनी ठेक्याने लावण्यावरूनही तणाव वाढला होता. शुक्रवारी सकाळी या वादाने टोक गाठले आणि संतप्त महेंद्रने शेतातच साधना व नितीनवर कुऱ्हाडीने सपासप वार करून दोघांचा जागीच खून केला.

स्वत:ही केली आत्महत्या -

खून केल्यानंतर महेंद्रने स्वतः विष प्राशन केले. त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलीस तपास सुरु -

घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस शेजारी व नातेवाईकांचे जबाब नोंदवून पुढील तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in