ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आघाडीला ठेंगा? स्वतंत्र लढलो तर ६ जागा जिंकू, दिला गर्भित इशारा

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र...
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आघाडीला ठेंगा? स्वतंत्र लढलो तर ६ जागा जिंकू, दिला गर्भित इशारा
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/मुंबई

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र, ॲड. प्रकाश आंबेडकर जागा वाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीलाच फैलावर घेत आहेत. जागा वाटपात कॉंग्रेस आणि शिवसेनेत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे त्यांचे जागावाटप होत नाही. त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. यात सन्मानजनक तोडगा न काढल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढायला तयार आहोत. स्वतंत्र लढलो तर किमान ६ जागा येऊ शकतात, असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे ऐनवेळी ॲड. आंबेडकर महाविकास आघाडीला धक्का देणार का, असे बोलले जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर नागपूर दौ-यावर होते. येथे रवी भवनला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीबाबत स्पष्टच बोलल्याने ऐनवेळी ॲड. आंबेडकर आघाडीला ठेंगा दाखविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ॲड. आंबेडकर यांनी एकीकडे महाविकास आघाडीशी बोलणी करून पंतप्रधान मोदी यांना धडा शिकविण्याची भाषा करीत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीलाच कोंडीत पकडण्याचा धडाका सुरू आहे. त्यात ते वेगवेगळया ठिकाणी सभा घेऊन शक्तिप्रदर्शनही करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये साशंकता वाढली आहे. यातून दुरावा वाढल्यास कदाचित ॲड. आंबेडकर वेगळी भूमिका घेऊ शकतात, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आघाडीचे नेत्यांमध्ये साशंकता वाढली आहे.वंचित बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत.

शिवसेना-कॉंग्रेसमध्येच वाद

जागावाटपाबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे जागावाटप अद्याप झालेले नाही. आम्ही सातत्याने त्यांच्याशी बोलत आहोत. यासंदर्भात शेवटच्या क्षणापर्यंत बोलू आणि युती हवी आहे. प्रत्येकाची ताकद लक्षात घेऊन हे जागावाटप झाले पाहिजे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे त्यांच्या क्षमतेचा अंदाज प्रत्येकाला आहे. ती क्षमता पाहून जागा लढवाव्यात, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in