वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये! संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये! संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.

पुणे : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.

त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र हांडगं स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरे स्वातंत्र्य आहे, असेही संभाजी भिडे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in