World Poha Day: नागपुरात ३ हजार किलो तर्री पोहा अन् मोफत वाटप चर्चेत; शेफ विष्णू मनोहरांच्या या डिशची खासियत काय?

नागपुरातील 'विष्णुजी की रसोई' (सेंट्रल बाजार रोड, बजाज नगर येथे विशाल मनोहर यांनी मोठ्या कढईत टीमच्या मदतीने तब्बल ३,००० किलो तर्री पोहा तयार केला.

Published on

दरवर्षी ७ जून रोजी साजरा होणाऱ्या 'जागतिक पोहा दिना'निमित्त यंदा नागपुरात भव्य आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेफ विशाल मनोहर यांनी तब्बल ३,००० किलो तर्री पोहा तयार करून सर्वांचे लक्ष वेधले. या उपक्रमाचा उद्देश केवळ विक्रम करणे नसून, नागपुरच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणे हा देखील होता.

नागपुरातील 'तर्री पोहा' ही केवळ नाश्त्याची डिश नसून शहराची ओळख बनलेली खाद्यपरंपरा आहे. या भव्य कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पर्यटक आणि खाद्यप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

शेफ विशाल मनोहर यांचा ३,००० किलो पोह्यांचा विक्रम

नागपुरातील 'विष्णुजी की रसोई' (सेंट्रल बाजार रोड, बजाज नगर येथे विशाल मनोहर यांनी मोठ्या कढईत टीमच्या मदतीने तब्बल ३,००० किलो तर्री पोहा तयार केला.

या उपक्रमाबाबत बोलताना शेफ विशाल मनोहर यांनी सांगितले की, नागपुरच्या तर्री पोह्यांची ओळख जगभर पोहोचावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी सांगितले की, "तर्री पोहा ही केवळ डिश नसून नागपुरची सांस्कृतिक ओळख आहे."

तर्री पोहा काय आहे?

नागपुरातील तर्री पोहा ही एक खास स्थानिक डिश आहे. साध्या पोह्यांपेक्षा ही डिश वेगळी असून तिच्यावर 'तर्री' म्हणजेच मसालेदार ग्रेव्ही घातली जाते. ही ग्रेव्ही हरभरा, उडीद डाळ किंवा मसालेदार बेसनापासून तयार केली जाते. त्यावर कांदा, शेव, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून हे पोहे अधिक चविष्ट बनवला जातात.

मोफत पोह्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विशाल मनोहर यांचा विक्रमाचा प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर तयार केलेले ३,००० किलो पोहे नागरिकांना मोफत वाटण्यात आले. सकाळी ६:३० ते ९:३० या वेळेत हे पोहे आणि गरम चहा उपस्थितांना देण्यात आला. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

logo
marathi.freepressjournal.in