Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात शिकवणी शिक्षकाने वारंवार बलात्कार करून मुलीला गर्भवती केल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव
Published on

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात शिकवणी शिक्षकाने वारंवार बलात्कार करून मुलीला गर्भवती केल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, गर्भपातासाठी औषधं पुरवणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी सुरू आहे.

मृत मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि ती साडेचार महिन्यांची गर्भवती होती. बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी नांदेडमधील एका डॉक्टरशी संपर्क साधला. डॉक्टरने तिला गर्भपातासाठी काही गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर मुलीला गंभीर रक्तस्राव होऊन प्रकृती बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

२८ वर्षीय संतोष गुंडेकर या शिकवणी शिक्षकावर डिसेंबर २०२४ पासून अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. नांदेडमधील ज्याने गर्भपातासाठी औषधं दिली त्या डॉक्टरकडे आवश्यक परवाना नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावरही गुन्हा नोंदवण्याची शक्यता असून चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे पुसद शहरात संतापाचं वातावरण असून, आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in