शिक्षकाने केले १२ वर्षांच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातून सुद्धा अशाच प्रकारची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिक्षकाने १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केले आहे.
शिक्षकाने केले १२ वर्षांच्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
Published on

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातून सुद्धा अशाच प्रकारची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिक्षकाने १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील शिक्षक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात या अगोदर तुरुंगाची हवा खाऊन आला असून तो जामीनावर बाहेर आहे. पुन्हा त्याच शाळेत रूजू झाल्यानंतर पुन्हा तसाच घाणेरडा प्रकार त्याने केला असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपी शिक्षक निवृत्ती काळभोर याला अटक केली आहे. तर या शिक्षकावरती अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना सुद्धा शालेय सेवत रुजू केल्याप्रकरणी विद्यालयाचे मुख्याध्यापक, ट्रस्टचे अध्यक्ष यासह अन्य सदस्यांनाही अटक केली आहे. यात एका महिला सदस्याचाही समावेश आहे. या शिक्षकाला पुन्हा सेवेत कसे घेतले याची चौकशीही पोलीस करत आहे.

बदलापूरच्या घटनेमुळं पीडित १२ वर्षीय मुलीने शिक्षकाने अत्याचार केल्याचं मोठ्या हिमतीने वर्ग शिक्षेकेला सांगितल्याने घटनेला वाचा फुटली. दोन वर्षे पीडित पी.टी. शिक्षकाचे अश्लील कृत्य सहन करत होती. २०२२ ते २०२४ या कालावधीत त्याने हे कृत्य केले. शिवाय तो पीडित मुलीला जीवे मारण्याची वारंवार धमकी देत अत्याचार करत होता असा आरोप पीडित मुलीने केला आहे. ही बाब तिने आपल्या पालकांना सांगितली त्यानंतर त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

धक्कादायक बाब म्हणजे २०२८ साली सुद्धा या नराधाम शिक्षकाने अशाच प्रकारे लैंगिक छळ केले होते. ती माहितीही समोर आली आहे. त्यावेळी त्याच्यावर विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याला शिक्षा देखील सुनावण्यात आली होती. त्यानंतर ही शिक्षक जामीनावर बाहेर आला. जामीन मिळाल्यानंतर तो त्याच महाविद्यालयात पुन्हा रूजू झाला. त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्याने पुन्हा: एका मुलीचे लैंगिक शोषण केले.

२०१८ मध्ये देखील काळभोरन कीर्ती विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग केला होता. निगडी पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल होता. तरीही शाळेच्या संस्था चालकांनी जुजबी कारवाई करत पुन्हा त्याला रुजू केले. याप्रकरणी कीर्ती विद्यालयाच्या संचालक कमिटीला देखील पोलिसांनी गुन्ह्यात अटक केली आहे.

ली. सोफिया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक जाधव याच्यासह कमिटीतील महिला सदस्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in