पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या आरोपीस अटक

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विराज पवार याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले
पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या आरोपीस अटक

मुंबई : पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या विराज रघुनाथ पवार या तरुणाला पार्कसाइ्रट पोलिसांनी अटक केली. बेडीने पोलीस शिपायावर हल्ला करून दुखापत केल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्याच्याविरुद्ध मारहाण करून शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी, २२ फेब्रुवारीला रात्री वाजता घाटकोपर येथे एक तरुण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याची माहिती पार्कसाइट पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन विराज पवार याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. यावेळी तो जोरजोरात आरडाओरड करून तो पोलीस ठाण्यात धिंगाणा घालू लागला होता. त्याच्या हातात बेडी घालण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याच बेडीने पोलिसांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलीस शिपाई बालाजी डोईफोडे यांना दुखापत झाली होती. त्यांना शिवीगाळ करून त्याने जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर अखेर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in