अदानीकडून मुंबईत २,६५० फ्लड लाइट्स; गणेश विसर्जनासह माऊंट मेरी जत्रेसाठी सोय

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबई महापालिकेच्या १५ प्रभागांमध्ये १६७ गणेश विसर्जन ठिकाणांवर २,५७१, तर माउंट मेरी जत्रेसाठी, चर्चच्या आसपास ८० असे एकूण २ हजार ६५० प्रखर प्रकाश झोताचे दिवे लावले आहेत.
अदानीकडून मुंबईत २,६५० फ्लड लाइट्स; गणेश विसर्जनासह माऊंट मेरी जत्रेसाठी सोय
Published on

मुंबई : मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबई महापालिकेच्या १५ प्रभागांमध्ये १६७ गणेश विसर्जन ठिकाणांवर २,५७१, तर माउंट मेरी जत्रेसाठी, चर्चच्या आसपास ८० असे एकूण २ हजार ६५० प्रखर प्रकाश झोताचे दिवे लावले आहेत. माउंट मेरी जत्रा ५ ते १४ सप्टेंबर दरम्यान असून भक्तांना अखंड वीज मिळून त्यांना आनंदात आणि विना अडथळा सणांचा आनंद घेता यावा, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे, असे अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

गणेश विसर्जनाच्या दिवशी तसेच माउंट मेरी जत्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाली तरी तिला तोंड देण्यासाठी आमची पथके शहरात मोक्याच्या जागी सज्ज आहेत, असेही प्रवक्त्याने सांगितले. उत्सवाच्या आयोजकांना सहजपणे तात्पुरती वीज जोडणी मिळावी, यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने आपली व्यवस्था सज्ज ठेवली होती. त्यानुसार यावर्षी सुमारे एक हजार मंडळांना अर्ज केल्याच्या ४८ तासांच्या आत तात्पुरती वीज जोडणी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in