Mumbai : जॉब करण्यासाठी गेली अन् घडलं आक्रीत; विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ जण फरार

मुंबईतील अंधेरी परिसरात पार्ट-टाईम जॉब करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुषमा राव (वय ३१) या स्ट्रगलिंग मॉडेलला अटक करण्यात आली असून तिचे दोन साथीदार फरार आहेत.
Mumbai : जॉब करण्यासाठी गेली अन् घडलं आक्रीत; विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ जण फरार
Published on

मुंबईतील अंधेरी परिसरात पार्ट-टाईम जॉब करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुषमा राव (वय ३१) या स्ट्रगलिंग मॉडेलला अटक करण्यात आली असून तिचे दोन साथीदार फरार आहेत.

पार्ट-टाईम जॉबच्या बहाण्याने फसवणूक

पीडित विद्यार्थिनी गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी पार्ट-टाईम जॉब करत होती. हे काम सुषमा रावच्या मार्गदर्शनाखाली चालत होते. सुषमाने तरुणीला सांगितले होते की तिचे तात्पुरते कार्यालय अंधेरी पूर्वेतील जेबीनगर येथील एका लॉजमधील भाड्याच्या खोलीत चालू आहे. या ठिकाणी फक्त सुषमा आणि पीडिता दोघीच उपस्थित असत.

कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचे औषध

घटना घडलेल्या दिवशी सुषमाने कामाच्या ठिकाणी पीडितेला कोल्डड्रिंक दिले. त्या पेयात गुंगीकारक औषध मिसळले होते. काही वेळातच विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेत सुषमाने तिच्या दोन साथीदारांना लॉजमध्ये बोलावले. या दोघांनी एकामागून एक विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

शुद्ध आल्यावर भयंकर सत्य

काही वेळानंतर विद्यार्थिनीला शुद्ध येताच तिच्या शेजारी दोन अनोळखी पुरुष बसलेले पाहून ती घाबरली. त्यानंतर सुषमानेच पीडितेला तिचे काढलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवत धमकावले. घाबरून विद्यार्थिनीने कसाबसा तिथून पळ काढला आणि रात्री उशिरा अंधेरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

पोलिसांचा तपास सुरू

तक्रार मिळताच परिमंडळ १० चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुषमा राव आणि तिच्या साथीदारांविरुद्ध सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देणे, अश्लील व्हिडिओ तयार करणे आणि विनयभंग यांसह गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सुषमाला अटक करून चौकशी सुरू आहे, तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरु आहे.

लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके नेमली आहेत.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या प्रकारामुळे अंधेरी परिसरातील नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्ट-टाईम जॉबच्या नावाखाली विद्यार्थिनींची होणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in