Anil Parab : सोमय्या विरुद्ध परब; शिवसैनिकांचे म्हाडासमोर आंदोलन, अनिल परबांनी दिले सोमय्यांना खुले आव्हान

शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये म्हाडा कार्यालयामध्ये दाखल झाले आणि किरीट सोमय्या यांचा निषेध केला. तर, अनिल परबांनी (Anil Parab) दिले सोमय्यांना खुले आव्हान
Anil Parab : सोमय्या विरुद्ध परब; शिवसैनिकांचे म्हाडासमोर आंदोलन, अनिल परबांनी दिले सोमय्यांना खुले आव्हान

शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार अनिल परब (Anil Parab) यांचे वांद्रे येथील म्हाडा (MHADA) कॉलनीतील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. तसेच, पाडकामाची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या त्याठिकाणी जाण्यास निघाले होते. मात्र, पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना अडवले आणि परत पाठवले. या दरम्यान, अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन खुले आव्हान दिले. ते म्हणाले की, "किरीट सोमय्यांनी नारायण राणेंच्या पाडकामाचे काम पाहायला जावे. इकडे आलात तर मी आणि माझे शिवसैनिक तुमचे चांगलेच स्वागत करतील. सोमय्या काय म्हाडाचे मुकादम आहेत का?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अनिल परब आणि शिवसेना कार्यकर्त्ये जाब विचारण्यासाठी म्हाडा कार्यालयात

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये म्हाडाच्या कार्यालयात घुसून जाब विचारला. काही कार्यकर्त्यांनी ठिय्या देत किरीट सोमय्या आणि भाजपचा निषेध केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हेदेखील या आंदोलनात उपस्थित होते. तसेच, अनिल परब हेदेखील म्हाडा कार्यालयामध्ये दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी करण्यात आला होता. यावेळी वांद्रे येथे जाणाऱ्या किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अडवले.

काय म्हणाले अनिल परब?

यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, "मी १९६०पासून त्या इमारतीचा रहिवासी आहे. माझा सर्व बालपण या इमारतीमध्ये गेले आहे. सोसायटीच्या परवानगीनेच मी कार्यालय सुरु केले होते. रहिवाशांच्या विनंतीवरुन माझे जनसंपर्क कार्यालय सोसायटीमध्ये सुरु झाले. मुळातच ही जागा एलआयसीची आहे. उच्चं न्यायालयाच्या सुचनेनुसार ही जागा नियमित करण्यासाठी रहिवाश्यांनी अर्ज केला. ही जागा नियमित करता येणार नसल्याचे कळल्याने मोकळी केली. मी म्हाडाला पत्रदेखील लिहिले होते." तर, "ही जागा नियमित होऊ नये यासाठी सोमय्यांनी दबाव आणला. बिल्डरांकडून सुपाऱ्या घेऊन सोमय्यांनी ही खेळी केली. याला भाजपचा पाठिंबा आहे का?" असा गंभीर आरोप केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in