Blinkit चा डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, लिफ्टमध्येच लघुशंका करून गेला; वास आल्यानंतर....

विरार पश्चिमेतील सीडी गुरुदेव बिल्डिंगमध्ये Blinkit कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये लघुशंका केल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. १८ जुलै रोजी घडलेली ही घटना इमारतीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Blinkit चा डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, लिफ्टमध्येच लघुशंका करून गेला; वास आल्यानंतर....
Published on

विरार पश्चिमेतील सीडी गुरुदेव बिल्डिंगमध्ये Blinkit कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये लघुशंका केल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. १८ जुलै रोजी घडलेली ही घटना इमारतीतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डिलिव्हरी बॉयचे घाणेरडे वर्तन पाहून सोसायटीतील रहिवाशांनी आणि नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कॅमेऱ्यासमोर पाठ फिरवून लघुशंका

CCTV फुटेजमध्ये संबंधित डिलिव्हरी बॉय हातात पार्सल घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसतोय. काही क्षणांत तो कॅमेऱ्याकडे पाठ फिरवतो आणि लिफ्टच्या एका कोपऱ्यात लघुशंका करतो. हा प्रकार पूर्णतः जाणूनबुजून केल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण तो कॅमेऱ्यापासून लपण्याचा प्रयत्नही करताना दिसतोय.

दुर्गंधीमुळे प्रकार उघडकीस

ही घटना १८ जुलै रोजी दुपारी घडली होती. मात्र, संध्याकाळपर्यंत लिफ्टमध्ये दुर्गंधी आणि अस्वच्छता जाणवू लागल्याने काही रहिवाशांना शंका आली. त्यानंतर लिफ्टमधील CCTV फुटेज तपासण्यात आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संतप्त रहिवाशांची Blinkit कार्यालयात धडक

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी Blinkit च्या जवळील कार्यालयात जाऊन संबंधित डिलिव्हरी एजंटची ओळख पटवत त्याला जाब विचारला. त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणी रहिवाशांनी बोळींज पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली असून सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. Blinkit कंपनीकडून यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

Blinkit कंपनी

Blinkit ही एक भारतीय क्विक-कॉमर्स सेवा आहे. ही कंपनी ग्राहकांना किराणा व दैनंदिन आवश्यक वस्तू १० मिनिटांत घरपोच पोहोचवते.

logo
marathi.freepressjournal.in