Mumbai : उपायुक्त मोबाईलमध्ये व्यस्त, नगरसेवक संतप्त; नगरसेवकांच्या आक्षेपानंतर काही वेळ कामकाज थांबले

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा सुरु असताना अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीत बसलेल्या उपायुक्त संध्या नांदेडकर या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले.
उपायुक्त मोबाईलमध्ये व्यस्त, नगरसेवक संतप्त; नगरसेवकांच्या आक्षेपानंतर काही वेळ कामकाज थांबले
उपायुक्त मोबाईलमध्ये व्यस्त, नगरसेवक संतप्त; नगरसेवकांच्या आक्षेपानंतर काही वेळ कामकाज थांबले संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा सुरु असताना अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीत बसलेल्या उपायुक्त संध्या नांदेडकर या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले. यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर उपमहापौर संजय घाडी यांनी अतिरिक्त आयुक्तांना बोलवण्याचे निर्देश देत काही वेळ सभागृहाचे कामकाज थांबवले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

महापालिकेच्या सभागृहामध्ये आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर गेल्या आठवडाभरापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सभागृहात महापौर व उपमहापौरांच्या बाजूला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्तांना बसणे बंधनकारक आहे. पण अर्थसंकल्पीय चर्चा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहत असल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी अन्य कामे करण्यासाठी सभागृहात तात्पुरत्या स्वरूपात सभागृहात बसण्याची जबाबदारी उपायुक्तांवर सोपवली आहे.

उपायुक्त मोबाईलमध्ये व्यस्त, नगरसेवक संतप्त; नगरसेवकांच्या आक्षेपानंतर काही वेळ कामकाज थांबले
Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

सभागृहात भाजपाचे वरिष्ठ नेते प्रवीण छेडा यांचे भाषण सुरू असताना, सभागृहात उपस्थित असलेल्या उपायुक्त संध्या नांदेडकर या मोबाईलमध्ये व्यस्त होत्या. त्यामुळे छेडा यांनी भाषण अर्धवट थांबवत नांदेडकरांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सभागृहात नगरसेवक भाषण करताना त्याची नोंद ठेवणे आवश्यक असताना उपायुक्त मोबाईलवर कशा काय खेळू शकतात, असा सवाल करण्यात आला. यावर उपाय त्यांनी माफी न मागितल्यामुळे उपमहापौर संजय घाडी यांनी सचिव विभागाला निर्देश देत अतिरिक्त आयुक्तांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले. तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होणार नसल्याचेही उपमहापौरांनी ठणकावले.

नोंद घेणे बंधनकारक करा!

मुंबई शहराच्या विकासासाठी नगरसेवक आपले विचार सभागृहात मांडत असतो. यावेळी त्याची प्रशासनाने नोंद घेणे आवश्यक आहे. एवढंच नाही तर प्रत्येक खात्याचे अधिकारीही उपस्थित असायला हवे, असे निर्देश उपमहापौर संजय घाडी यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in